बातम्या

वॉशिंग्टन विद्यापीठानुसार भारतीयांमध्ये वृद्धत्वाची चाहूल लवकर

सकाळ न्यूज नेटवर्क

वॉशिंग्टन - जपानमध्ये वयोवृद्ध माणसांचे प्रमाण अधिक असते, असा साधारण समज आहे. पण वृद्धात्वाशी संबंधित आरोग्याच्या तक्रारी जपान किंवा स्वित्झर्लंडपेक्षा भारतात कमी वयातच आढळल्या आहेत. अशा वेगळ्या विषयावरील अभ्यास प्रथमच करण्यात आला असून, ‘लॅन्सेट पब्लिक हेल्थ’ या वैद्यकीय नियतकालिकामध्ये तो प्रसिद्ध करण्यात आला आहे.

अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधक व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा अभ्यास केला आहे. वेगवेगळ्या देशांत कमी व जास्त वयोगटातील अंतर साधारण ३० वर्षांचे असते. साधारण ६५ वर्षे वयोगटातील लोकांमध्ये आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. जपानमध्ये ७६ वर्षे, तर पापुआ न्यूगिनियामध्ये ४६ वर्षीच वृद्धात्वाशी संबंधित समस्या जाणवून लागतात, असे निरीक्षण संशोधकांनी नोंदविले आहे. भारतात साठीपूर्वीच आरोग्याचे प्रश्‍न उद्‌भवू लागतात, असेही आढळून आले आहे. ‘‘ज्येष्ठांच्या वयोगटात आयुर्मानात वाढ होणे ही एक संधी असते किंवा एकूण लोकसंख्येच्या कल्याणकारी योजनांसाठी तो एक धोका असतो,’’ असे मत लेखाच्या लेखिका व वॉशिंग्टन विद्यापीठातील पीएच. डी.च्या अभ्यासक अँजेला वाय. चॅंग यांनी व्यक्त केले. वयानुसार होणाऱ्या आजारांमुळे लवकर निवृत्ती घेणे, कामाचा उरक कमी होणे व आरोग्याकडे अधिक खर्च करावा लागणे आदी गोष्टींना सामोरे जावे लागते. नागरिकांमध्ये वृद्धत्वाचे परिणाम जाणवायला लागल्यास आरोग्य विभागातील सरकारी अधिकारी व अन्य कार्यकर्त्यांनी याचा विचार करणे आवश्‍यक ठरते, असेही त्या म्हणाल्या. या संशोधनासाठी जगातील १९५ देश व प्रांतातील १९९० ते २०१७मधील माहितीचा आधार घेण्यात आला आहे.

वाढत्या वयामुळे कामात अडथळे येणे, शारीरिक, मानसिक आरोग्य खालावणे तसेच विश्‍लेषण केलेल्या ९२ आजारांपैकी आकलन क्षमतेवर परिणाम होणे आदी नकारात्मक गोष्टी वाढीस लागतात. यातील पाच घटक हे संक्रामक असून ८१ घटक असंक्रामक आहेत. यात जखमांमुळे होणाऱ्या सहा घटकांचा समावेश आहे. ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसिज’मधील माहितीचा या अभ्यासाठी वापर करण्यात आला आहे. प्रमाणित वय, वयाशीसंबंधित व सर्व भार दर यामध्ये बहुतेक सर्व देशांची श्रेणी साधारण समान असली तरी वयाशी संबंधित रोगांमध्ये इथिओपिया, नायजेरिया आणि दक्षिण आफ्रिकाची कामगिरी अन्य भारापेक्षा चांगली असल्याचे दिसून आले. सर्व प्रकारच्या बोजांमधील गटात भारत व चीनचे कार्य चांगले आहे, असे या लेखात म्हटले आहे.

Web Title: Indians Feel Older Earlier Than Japanese Swiss finds study

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT